भुसावळात केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध सीआरएमएसची निदर्शने


भुसावळ- केंद्र शासनाने परेल वर्कशॉप बंद करून टर्मिनस बनवण्याचा घाट घातला आहे. त्या वरोधात सीआरएमएसतर्फे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. रेल्वे प्रशासनाने परेल वर्कशॉपमधील 715 कर्मचार्‍यांना बडनेरा येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश काढल्याने पीओएच शाखेने निर्णयाविरुद्ध आंदोलन छेडले आहे. सीआरएमएसच्या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने नॅशनल फेडरेशन आर्फ इंडीयन रेल्वेमेन्सच्या पदाधिकार्‍यांना चर्चेसाठी बोलावले आहे.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात मंडल अध्यक्ष व्ही.के.समाधीया, झोनल सचिव पी.एन.नारखेडे, मंडल सचिव एस. बी.पाटील, शाखा सचिव डी.यू.इंगळे, मीडिया सेल सचिव मेघराज तल्लारे, ईश्वर बविस्कर, अजित अमोदकर, विकास सोनवणे, सुरेंद्र गांधेले, हरीचंद सरोदे, पी. के.जोशी, व्ही. एम. नेमाडे, फारुख खान, संदेश इंगळे, चंद्रकांत चौधरी, संदीप येवले, प्रमोद बाविस्कर, प्रशांत कमलजा यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !