धक्कादायक : रशियातून बेपत्ता झालेले विमान समुद्रात कोसळल्याने 28 प्रवाशांचा मृत्यू


मॉस्को : रशियातून बेपत्ता झालेल्या विमानाच डोंगराच्या टोकाला घासून समुद्रात कोसळल्याने 22 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. रशियातील कामचाट्का प्रायद्वीपमधील पालना गावात उतरणार होते पण, लँडींगपूर्वीच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर (-ढउ) सोबत संपर्क तुटला. विमानाने पेट्रोपावलोस्क-कामचाट्स्की शहरातून उड्डाण घेतले मात्र पालना शहरापासून 10 किलोमीटर दूर असताना विमानाचे मोठ्या डोंगराला घर्षण झाले आणि विमान समुद्रात कोसळले. रशियाचे पंतप्रधान मिखाइल मिशुस्तिनने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी क्रॅश झालेले विमान ट्विन-इंजिन असलेले टर्बोप्रॉप विमान होते. हे विमान सिविलियन आणि मिल्ट्री ट्रांसपोर्टसाठी वापरले जायचे. या विमानाची डिजाइन आणि उत्पादन सोवियत संघात 1969 ते 1986 दरम्यान झाले आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !