भुसावळातील बर्हाटे शाळेत विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर
भुसावळ- शहरातील बर्हाटे विद्यालयातील एकूण 459 विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी लायन्स क्लबतर्फे करण्यात आली. बुधवार 7 ऑगस्ट रोजी पुंडलिक गणपत बर्हाटे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात लॉयन्स क्लब अध्यक्ष सतीश गोळीवाले, सचिव राजेश.डी.पाटील, कॅबिनेट ऑफीसर गोपाल अग्रवाल, डॉ.नरेंद्र भोलाणे, डॉ.एस.एम.महाजन, डॉ.उमाकांत चौधरी, डॉ.भूषण लोखंडे, डॉ.अविनाश पाटील, डॉ.शीतल भंगाळे, डॉ.राजेश गुप्ता, डॉ.विलास बेंडाळे, दंत रोगतज्ञ विजय जैन, व्हा.प्रेसी.विनोद सोहळे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. यावेळी संस्थाध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, सचिव सुभाष बर्हाटे, मुख्याध्यापक, सुधीर पाटील, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी, प्रशांत चौधरी, अनिल बोरोले, व शिक्षक उपस्थित होते.