भुसावळातील पुरातन महालक्ष्मी मंदिरात आमदारांच्या हस्ते उद्या आरती
भुसावळ- शहरातील खडकारोड भागातील पुरातन महालक्ष्मी मंदिराला नवसाला पावणारे मंदिर म्हणून ख्याती आहे. 2001 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. जीर्णोद्धरानंतर मंदिर परीसरात वृक्षारोपण करण्यात आल्याने परीसर हिरवाईने नटला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते आरती होणार आहे.
शंभूराजे ग्रुपतर्फे भव्य आरास उभारणी
शहरातील गांधी नगरातील नवनिर्माण मंडळ संचलित शंभूराजे ग्रुपतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त भव्य आरारसची उभारणी करण्यात आली आहे. आकर्षक उंच मूर्तीचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दत्तु आवटे
यांच्या हस्ते स्थापना करण्यात येणार असल्याचे आयोजक गौरव राजेंद्र आवटे यांनी कळवले आहे.