अपहरणानंतर 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार


नवी दिल्ली : 19 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर सात लोकांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार राजस्थानच्या अलवरमध्ये उघडकीस आला आहे. नराधमांनी मुलीला बेशुद्धावस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देत त्यांनी पळ काढला.

आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध
पोलिसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर जबाब नोंदविला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. 4 जुलैच्या रात्री साधारण 11.30 वाजता पीडीता घराबाहेर गाय बांधण्यासाठी आली असता संशयीत मोहम्मद, सद्दाम आणि साजीद यांनी तरुणीला ताहिरच्या घरी नेत बलात्कार केला. यानंतर तिघांनी पीडितेला गाडीत टाकून सांखला गावी नेल्यानंतर ताहिरचे मित्र उमरदीन आणि मरमेज या दोघांनी पीडितेवर बलात्कार केला व त्यानंतर 19 वर्षांच्या पीडितेला दिवाकरी गावात नेण्यात आले व तेथेही कुम्हार आणि अरबान यांनीही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर रात्री उशिरा पीडितेला त्यांनी वीट भट्टीजवळ सोडून पळ काढला. घरी परतल्यानंतर पीडितेने कुटुंबीयांना आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !