जळगावात तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी जाळ्यात
जळगाव : शहरातील यमुना नगर, लीला पार्क परीसरात धनंजय छोटू विसपुते (23) हा तलवारीच्या धाकावर शनिवारी सकाळी दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्या ताब्यातून तलवार जप्त केली.आरोपीविरॐद्ध एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी मार्गदर्शनाखाली व जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे हवालदार शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, रवींद्र घुगे, गफुर तडवी, महेश पाटील, महेश महाजन यांच्या पथकाने केली.