बोदवड स्टेट बँकेचा मनमानी कारभार ; सेना पदाधिकार्यांनी विचारला जाब
बोदवड- शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचार्यांकडून बँक ग्राहकांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यासह नाहक मनस्ताप देण्यासह विद्यार्थ्यांना एज्युकेशनल लोन देण्यात दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेकडे आल्यानंतर पदाधिकार्यांनी बँकेत धडक देत व्यवसापकांशी चर्चा केली. अपूर्ण कर्मचारी वर्ग तसेच तांत्रिक अडचणींचे यावेळी कारण पुढे करण्यात आली शिवाय बँक भाड्याच्या जागेत असून जागा मालकाने बँकेला जागा खाली करण्याचे सांगितल्याने दुसरी जागा पाहण्याची धावपळ सुरू असल्याचे बँक व्यवस्थापक म्हणाले. यावेळी बँकेने शेतकर्यांशी उद्धट वागू नये तसेच विद्यार्थ्यांना कर्ज देण्यास दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष महेंद्र मोंढाळे यांनी दिला. यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक अस्लम शेख, तालुकाप्रमुख गजानन खोडके, आतीष सारवान, खामखेडा शाखाप्रमुख योगेश पाटील, अतुल पाटील, सोमेश्वर पाटील, योगेश राजपूत, अमोल व्यवहारे यांच्यासह घाणखेड, मनूरचे नागरीक उपस्थित होते.