साळसिंगीच्या तरुण शेतमजूराचा साठवण बंधार्‍यात बुडाल्याने मृत्यू


बोदवड- तालुक्यातील साळसिंगी येथील महेश नामदेव दातोळे (38) या तरुण शेतमजुराचा शनिवारी सायंकाळी साठवण बंधार्‍यात बुडाल्याने मृत्यू झाला. महेश हा तरुण शेतातून मजुरी करून परतत असताना गावाजवळील साठवण बंधार्‍यात हात-पाय धुण्यासाठी थांबला व त्याचवेळी पाय घसरल्याने त्याचा बुडाल्याने मृत्यू झाला. ढोले नावाच्या शेतकर्‍याने ही घटना पाहिल्यानंतर ग्रामस्थांना कळवल्यानंतर साळसिंगी येथील भिल्ल तरुणांनी मृतदेह शोधून काढला. मयत तरुणाच्या पश्‍चात वृद्ध आई राहते व तर पत्नी व दोन मुले सुरतमध्ये राहतात.

बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
शिवाजी रामदास काळबैले यांच्या खबरीनुसार बोदवड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास विजेश पाटील करीत आहेत. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. रविवारी सकाळी मयत तरुणावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या घटनेने साळसिंगी गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.


कॉपी करू नका.