सुसंस्कृत शिक्षणाने उत्तम माणूस घडतो -प्रा.नितीन बारी

भुसावळ- सुसंस्कृत शिक्षणाने उत्तम माणूस घडतो, शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास होतो तसेच कलेचा दृष्टिकोन प्रत्येकाने आपल्या मनात निर्माण केला पाहिजे. शिक्षणामुळे आपले ध्येय व उद्दिष्ट पूर्ण होतात, विचार व निर्णय घेण्याची क्षमता विकसीत होत असल्याचे विचार कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परीषद सदस्य प्रा.नितीन बारी यांनी येथे व्यक्त केले. श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात कला व वाड़मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की महाराष्ट्रात उमवि जळगाव हे पहिले विद्यापीठ असे आहे की जे विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी पहिले विद्यार्थी साहित्यसंमेलन आयोजित करीत आहे. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.डॉ.शिल्पा पाटील होत्या. कला व वाड़मय मंडळाचे प्रमुख प्रा.निलेश गुरुचल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.स्वाती हडप तर आभार प्रा.दीपाली पाटील यांनी मानले. प्रा.व्ही.एस.पाटील, प्रा.नीता चोरडीया, डॉ.गिरीश कोळी, प्रा.चेतन आमोदकर, प्रा.विकास सपकाळे, प्रा.जकिर शेख आदी उपस्थित होते.




