मलेरीया नियंत्रणासाठी गप्पी मासे लाभदायक : डॉ.जमादार
भुसावळ : जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांनी भुसावळ शहरास भेट देवून डास उत्पत्ती स्थानांची पाहणी केली असता यावल रोडलगतच्या गटारीत मुबलक प्रमाणात गप्पी मासे आढळून आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. शहर मलेरीया नियंत्रणासाठी गप्पी माशांची भूमिका लाभदायक असून ज्या पाण्याच्या डबक्यांमध्ये/गटारीमध्ये गप्पी मासे आहेत त्या भागात डास जन्मास येणारच नाही, असे त्यांनी सांगितले. डास उत्पत्ती ठिकाणी गप्पी मासे सोडल्यानंतर गप्पी मासे डासांच्या अळ्या खातात परीणाम डासच तयार होत नाही पर्यायाने डासांपासून प्रसारीत होणार्या मलेरीया आजार नियंत्रण मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
वैयक्तीक संरक्षणासाठी नागरीकांनी घराचा परीसर स्वच्छ ठेवावा, पाण्याची डबकी वाहती अथवा मातीने बुजवावी, घरांच्या दारे-खिडक्यांना बारीक जाळी बसवावी, पावसाळ्यात डेंग्यू ताप रूग्णसंख्येत वाढ होण्याच्या अनुषंगाने पाण्याची भांडी झाकून ठेवावी, आठवड्याचा एक दिवस कोरडा पाळावा, ताप आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत जाऊन तापाची तपासणी करा व दिलेला उपचार पूर्ण घ्यावा, असे आवाहन डॉ. भिमाशंकर जमादार यांनी यावेळी केले.