धुळे गुन्हे शाखेची धडक कामगिरी : दीव-दमणनिर्मित दारूची जनरेटरमधून होणारी तस्करी रोखली : 16 लाखांचा मुद्देमाल जप्त
‘पुष्पा’ चित्रपटाचा तोडला रेकॉर्ड ः चक्क जनरेटरमधून दारूची वाहतूक

Dhule Crime Branch’s impressive performance : Smuggling of Diu-Daman-made liquor through generators stopped : Goods worth Rs 16 lakh seized धुळे : (18 जानेवारी 2025) : दीव व दमण राज्यात निर्मित मात्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेल्या मद्याची चक्क जनरेटरद्वारे होणारी वाहतूक धुळ्यातील एलसीबीचे डॅशिंग निरीक्षक श्रीराम पवार यांनी रोखत ट्रकसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुष्पा चित्रपटाचाही रेकॉर्ड आरोपींनी तोडत तस्करीचा नवा फंडा समोर आणल्याचे या कारवाईतून समोर आले. आरोपी धुळेमार्गे गुजरात राज्यात वाहतूक करीत असताना ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मद्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती 17 रोजी दुपारी कळताच त्यांनी पथकास निर्देश दिले. पथकाने सुरत बायपास रोडवरील खान्देश कॅन्सर सेंटर समोर महामार्गावर बॅरीकेट लावत आयशर (एम.एच.17 बी.वाय 1052) क्रमांकाच्या वाहनाला अडवत चालक विकाससिंग नगेंद्रसिंग चौहान (26, रा.रुम नं.13, धर्मेशभाईको चाळ, भिमपौर, दमण) याची चौकशी केली असता त्याने वाहनातून कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर गुजरात राज्यात घेवून जात असल्याचे सांगितले मात्र जनरेटरची तपासणी केली असता त्यातील पोकळ भागात विविध कंपनीचा दारूसाठा मिळून आला.
चार लाख 17 रुपये किंमतीची विदेशी दारु, रम व बिअर आणि 12 लाखांचा ट्रक असा एकूण 16 लाख 17 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही विदेशी दारु विक्रीबाबत दादरा नगर हवेली प्रशासनाचे फॉर सेल इन यु.टी ऑफ दादरा नगर हवेली अॅण्ड दमण अॅण्ड दिव ओन्ली, निर्देश असतांनाही महाराष्ट्र राज्यात वाहतूकीचा किंवा पुरवठा करण्याचा परवाना नसतांना शासनाचा कर बुडवून शासनाची फसवणूक करून महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याचा उद्देशाने मालाचे मालक, खरेदीदार व पुरवठादार यांचे संगनमताने बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करतांना ट्रकचालक मिळून आला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली धडक कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, संजय पाटील, पंकज खैरमोडे, पवन गवळी, आरीफ पठाण, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, मयुर पाटील, सुशील शेंडे, राहुल गिरी, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.
