माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहासह आठ जणांविरोधात गुन्हा


मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या असून त्यांच्यासह आठ जणांविरोधात एका बिल्डरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 15 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या शिवाय इतरही पाच पोलीस कर्मचारी आणि दोन इतर नागरीकांविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये क्राइम ब्रांच यूनिटमधील डीसीपी तसेच इतर पोलीस कर्मचारी क्राइम ब्रांचच्या वेगवेगळ्या युनिट्समध्ये इंस्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. याप्रकरणी ज्या दोन नागरिकांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे मात्र अद्याप कुठल्याही पोलीस कर्मचार्‍याला अटक करण्यात आलेली नाही.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !