भुसावळात जागतिक हृदय दिनानिमित्त जनजागृती रॅली
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन व आयएमएचा संयुक्त उपक्रम
भुसावळ- भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन व आयएमए भुसावळ शाखेच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक हृदय दिनानिमित्त रविवारी पहाटे 6.45 वाजता जनजागृती काढण्यात आली. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून रॅलीचा शुभारंभ झाला. भुसावळ रेल्वे स्टेशन संचालक जी.आर.अय्यर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आयएमए भुसावल अध्यक्ष डॉ.दिनेश फिरके, रनर ग्रुप अध्यक्ष प्रा.प्रवीण फालक, डॉ.व्ही.एन.चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
रॅलीला भुसावळकरांचा प्रतिसाद
जनजागृती रॅलीत शहरातील डॉक्टर्स, वकील, इंजिनिअर्स, रेल्वे व पोलिस विभागातील कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक तसेच शेकडो आबालवृद्ध नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. ‘हृदयाची काळजी घ्या’, ’स्वतःसाठी वेळ द्या’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. नवशक्ति आर्केड जवळून वळसा घेऊन रॅली पुन्हा 7.25 वाजता कार्यक्रमस्थळी दाखल झाली. रॅलीचे नेतृत्व प्रा.प्रमोद शुक्ला व पूनम भंगाळे यांनी केले. वाहतूक नियमन मुकेश चौधरी, डॉ.निर्मल बलके ,सुनील सोनगीरे यांनी केले. त्यानंतर डॉ.दीपक जावळे यांनी उपस्थितांना हृदयाची काळजी कशी घ्यावी? याविषयी मार्गदर्शन केले.
यांचा रॅलीत सहभाग
याप्रसंगी डॉ.लीना फिरके, डॉ.संज्योत पाटील, डॉ.हर्षा फिरके, डॉ.मिलिंद धांडे यांनी एखाद्या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आल्यास काय प्राथमिक उपचार करावे व ह्रदय सुरू करण्यासाठी काय कृती करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील तर आभार समन्वयिका डॉ.नीलिमा नेहेते यांनी मानले. यशस्वीतेसाठी दीपेश सोनार, प्रवीण वारके, रणजीत खरारे, गणसिंग पाटील, संजय भटकर, गोपाळ सोनवणे, निलेश लाहोटी, नकुल असावा, अखिलेश कनोजिया, मनोहर गायकवाड, चारुलता अजय पाटील, अजय पाटील, योगेश मांडे, बिट्टू कुमार वर्मा, हर्षल चौधरी, राहुल अग्रवाल यांनी सहकार्य केले.