आमदार संजय सावकारे 3 रोजी भरणार उमेदवारी अर्ज
भुसावळात प्रचार कार्यालयाच्या जागेचे पूजन : शक्तीप्रदर्शन होवून दाखल होणार अर्ज
भुसावळ- भाजपाचे विद्यमान आमदार संजय सावकारे हे 3 रोजी आपल्या कार्यकर्ते व समर्थकांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सलग दोन टर्मपासून आमदार असलेल्या सावकारे यांनी शहर व ग्रामीण भागात प्रचाराचा धुराळा उडवला आहे. जामनेर रोडवरील सोनिच्छावाडी रुग्णालयासमोर दर्डा भवनात भाजपाचे प्रचार कार्यालय असणार आहे. या कार्यालयाच्या जागेचे श्रीफळ वाढवून व पूजन रविवारी आमदार सावकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर मंडप बांधणीस सुरुवात करण्यात आली.
सावकारेंना तिकीट मिळण्याची समर्थकांना आशा !
राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे घोडे अडले असून युती होणार वा नाही याबाबत निश्चिती नाही तर भाजपाच्या जागेवर विद्यमान आमदारांसह अन्य सहा जणांनी दावा केल्याने अद्याप पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केली नसलीतरी सलग दोन टर्मपासून आमदार असलेल्या सावकारे यांनाच पक्षश्रेष्ठी उमेदवारी देतील, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास असल्याने त्यांनी प्रचाराचा धुराळा उडवला आहे.
यांची होती उपस्थिती
जामनेन रोडवरील दर्डा भवनाच्या जागेवर भाजपाचे प्रचार कार्यालय असणार असून या जागेवर मंडप बांधणीचा रविवारी दुपारी 12 वाजता शुभारंभ झाला. प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पंचायत समितीचे माजमी सभापती सुनील महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, भाजपा शहराध्यक्ष पुरूषोत्तम नारखेडे, नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, नगरसेवक व उद्योजक मनोज बियाणी, प्रा.प्रशांत पाटील, विस्तारक दिनेश नेमाडे, रमाशंकर दुबे, पवन बुंदेले, किन्हीचे माजी सरपंच सुरेश येवले, माजी उपसरपंच बंटी सोनवणे, किरण घुले, जयंत पाटील, दिलीप सुरवाडे, सचिन येवले, साकरीचे कृउबा माजी सभापती सोपान भारबे, विनोद सोनवणे, चंदू तायडे, किरण चोपडे, खडका माजी सरपंच चुडामण भोळे, प्रमोद भोळे, भैय्या महाजन, संजयसिंग पाटील, अनिकेत पाटील , सुमित बर्हाटे , पृथ्वीराज पाटील, भुसावळ तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.