कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी दिला पदाचा राजीनामा
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपाल यांना सोपवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उउाली आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी 35 मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बर्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या. वाढत्या वयामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून येडियुरप्पा यांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या मते कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.
यापूर्वी ट्वीटद्वारे संकेत
बुधवारी बीएस येडियुरप्पांनी ट्वीट करत आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. भाजपाचा इमानदार कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. मी उच्च विचारांचे अनुसरण करून पक्षाची सेवा केली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो की, त्यांनी पक्षाच्या आदशोचे पालन करावे.



