उद्योगपती राज कुंद्राची न्यायालयीन कोठडीत रवानगी


मुंबई : उद्योगपती राज कुंद्रा यास पॉर्न चित्रपट तयार करण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आरोपी कुंद्रा याची मंगळवारी कोठडी संपल्यानंतर त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी कुंद्राची पोलिस कोठडी संपण्याच्या काही वेळ आधीच त्याला मुंबईच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीला क्लीन चिट दिली नसल्याचे गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. गुन्हे शाखेने कोर्टाला सांगितले की, कुंद्रा चौकशीत सहकार्य करत नाही. त्याची आणखी चौकशी करण्याची गरज आहे. कुंद्राच्या वकिलाने म्हटले की, पोलिसांनी कुंद्राची सुमारे 200 तास चौकशी केली आहे. तो संपूर्ण सहकार्य करत आहे.

हे सर्व करण्याची काय गरज होती ?
सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिस पथक राज कुंद्राला त्याच्या घरी चौकशीसाठी पोलीस पथक घेवून गेल्यानंतर शिल्पा शेट्टीने पोलिसांसमोरच पती राजला ‘आपल्याकडे सर्व काही आहे, तर मग हे सर्व करण्याची गरज काय होती? त्यामुळे कुटुंबाचे नाव खराब झाले आणि मला अनेक प्रोजेक्ट सोडावे लागले, असे सांगितल्याचे समजते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !