भुसावळात सट्टा खेळताना एकाला अटक

भुसावळ- शहरातील प्रोफेसर कॉलनीसमोर लिंबाच्या झाडाखाली सार्वजनिक जागी संशयीत आरोपी पंडित भालचंद्र कोळी (65, रा.महादेव वाडी, अट्रावल, ता.यावल) यास कल्याण-मटका जुगाराचा खेळ खेळताना अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यतून एक हजार 130 रुपये व सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर, हवालदार संजय भदाणे, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.




