कुर्ह्यात डेंग्यूचे थैमान : बालिकेचा तापाने मृत्यू
भुसावळ : तालुक्यातील कुर्हेपानाचे गावात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून नऊ वर्षीय बालिकेचा रविवारी तापाने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परीषद शाळेतील चौथीची विद्यार्थिनी पायल योगेश बोबडे (वय 10, बारी) ला सुमारे चार दिवसांपासून ताप आल्यान तिच्या भुसावळातील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच उलटी झाल्याने डॉ.रेखा पाटील यांनी जळगाव हलविण्याचा सल्ला दिला मात्र पायलचा मृत्यू झाला. पायलच्या अचानक झालेल्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त झाली.
गावात डेंग्यूचे अनेक रुग्ण
गावामध्ये डेंग्यू तापाचे 17 सप्टेंबर रोजी चार ते पाच रुग्ण आढळल्याचीचर्चा असून लोकप्रतिनिधी व आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्यांशी निगडीत नातेवाईक रुग्ण असल्याने ही बाब बाहेर आली नाही मात्र आता आणखी काही जणांना डेंग्यू झाल्याचा दाट संशय असून ग्रामपंचायत व आरोग्य प्रशासनाने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.