संतापजनक : नऊ वर्षीय चिमुकलीची अत्याचार करून हत्या


नवी दिल्ली : नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना दिल्ली घडली आहे. संशयीत आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. दिल्ली कंटोनमेंट पाीसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

शॉक लागून मेल्याचा केला बनाव
पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्मशानभूमीत असणार्‍या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण घरातून बाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. जवळपास सहाच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी फोन करुन त्यांना बोलावलं आणि मुलीचा मृतदेह दाखवला. वॉटर कूलरमधून पाणी पित असताना विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला असं त्यांनी पीडितेच्या आईला सांगितलं. यानंतर त्या पुजारी आणि इतर आरोपींनी मुलीच्या आईला पोलिसांना फोन करू नका, नाहीतर यामुळे गुन्हा दाखल होईल आणि पोस्टमॉर्टम करत तिच्या अवयवांची चोरी होईल, असे सांगत घाबरवलं. मुलीच्या हातावर जखमा होत्या तसेच तिचे ओठ निळे पडले होते अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांनी दिली आहे. यानंतर महिलेची संमती नसतानाही मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेने आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर जवळपास 200 लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !