वयाच्या 60 व्या पुन्हा लग्न गाठ : सेकंड इनिंग लग्नाची राज्यभरात चर्चा


अहमदनगर : वयाच्या 60 वर्षी लग्न…. होय बातमी अगदी खरीच आहे. लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल या भानगडीत न अडकता 60 वर्षीय आजोबांनी दुसरी इनिंग सुरू करीत 40 वर्षीय महिलेशी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह उरकला आहे. राज्यात या विवाहाची चांगलीच चर्चा होत आहे.

या लग्नाची सर्वदूर चर्चा
शिंदोडी येथील विदुर आजोबा तबा चिमाजी कुदनर यांनी आपल्या वयाच्या 60व्या वर्षी 40 वर्षीय महिलेशी विवाह उरकला आहे. कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलीचाही विवाह झाल्याने ते घरात ते एकटेच राहिले. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होत होते शिवाय शेती व जनावरेही सांभाळताना दमछाक होत होती. मुलगी व मित्र परीवाराने त्यांना दुसर्‍यांदा विवाह करण्याचा आग्रह धरला. राहुरी तालुक्यातील शिंगवे गावातील 40 वर्षीय सुमनबाईंसोबत मोजक्या वर्‍हाडी मंडळीच्या उपस्थितीत नुकताच हा विवाह पार पडला. आयुष्याच्या या टप्प्यावर पुन्हा या दोघांना जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदाने जीवनाची दुसरी इनिंग सुरू केली आहे.





 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !