बहिणीचे फोटो डिलीट न केल्याने मित्राची हत्या
नवी दिल्ली : मित्राच्या मोबाईलमध्ये असलेले बहिणीचे फोटो वारंवार सांगूनही मित्राने डिलीट न केल्याने मित्राची हत्या करण्यात आल्याची घटना उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात घडली. उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये राहणार्या 22 वर्षीय रंजन झा आणि सूरज शुक्ला यांच्यात मैत्री होती. एकमेकांच्या घरी त्यांचं येणं-जाणं असायचं. रंजनच्या मोबाईलमध्ये सूरजच्या बहिणीचे काही फोटो होते. ही बाब सूरजच्या लक्षात येताच त्याने त्यावर आक्षेप घेतला आणि ते फोटो तातडीने डिलिट करण्याची मागणी केली. मात्र रंजनने त्याला नकार दिला. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पुढे तो वाद विकोपाला गेला. त्यानंतर सूरजने रंजनवर चाकूचे वार केले. त्यात रंजनचा मूत्यू झाला. रंजनच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून सूरजवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.