भुसावळात फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईची संक्रांत


पावणेतीन लाखांचा दंड वसुल : कारवाईने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ

भुसावळ – विना तिकीट व आरक्षित डब्यात प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांविरुद्ध उघडण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत सोमवारी भुसावळ रेल्वे स्थानकावर झालेल्या कारवाईत विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून 88 हजार 863 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला तर रीझर्व्ह डब्यातून जनरल तिकीट प्रवास करणार्‍या 352 प्रवाशांकडून एक लाख 84 हजार 450 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. त्या शिवाय 13 अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करून त्यांना आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले तर दोन रेल्वे प्रवाशांनी दंड भरण्यास मनाई केल्याने आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, रेल्वे रूळ ओलांडणार्‍या 11 प्रवाशांवर तर महिला डब्यात प्रवास करणार्‍या 30 प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली.

यांचा मोहिमेत सहभाग
या मोहिमेत मुख्य तिकीट निरीक्षक वाय.डी.पाठक, विविध तपासणी पथकांच्या तिकीट निरीक्षकांसह एल.आर.स्वामी, व्हि.के.सचान, सी.आर.गुप्ता, ए.एम.खान, एन.पी.अहिरवार, हेमंत सावकारे आदींचा सहभाग होता.


कॉपी करू नका.