ऑलिम्पिंक स्पर्धेेत भारताला भालाफेकमध्ये सुवर्णपदक


टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करीत ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक पटकावले. नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसर्‍या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अ‍ॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं 81.16 मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना 85.30 मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात 82.40 मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं 83.98 मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले. दुसर्‍या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् 87.58 मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !