यावलमध्ये आयशर कलंडल्याने पिंपळगावच्या तरुणाचा मृत्यू : चौघै जखमी


यावल- शालेय पोषण आहार पोहोचवल्यानंतर परतीच्या मार्गावर जाणार्‍या आयशर ट्रकचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला तर चौघे जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सात वाजता अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील सुदर्शन चौकालगत घडला. या अपघातात सुरेंद्र देविदास पाटील (24, रा.पिंपळकोठा, ता.धरणगाव) हा तरुण ठार झाला तर अन्य चौघे जखमी झाले.

दुभाजकाचा अंदाज न आल्याने आयशर कलंडला
शालेय पोषण आहाराची वाहतूक करणारा आयशर (क्रमांक एम.एच.15 बी.जे.4193) घेऊन चालक कुलतारसिंग धनसिंग पाटील हा यावल शहरातील काही शाळांमध्ये पोषण आहार पोहच करून अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरून पिंपळकोठा, ता.धरणगाव येथे जात असताना सुदर्शन चित्रमंदिर चौकाजवळ दुभाजकाचा अंदाज न आल्याने आयशर रस्त्याच्या कडेला कलंडला. या अपघातांमध्ये सुरेंद्र देविदास पाटील (24, रा.पिंपळकोठा ता. धरणगाव) तरुण हा जागीच ठार झाला तर मनोज सोनुसिंग पाटील (31), रवींद्र भिकन सोनवणे (23), गोपाळ साहेबराव पाटील (24), लोटन भिवसन बडगुजर (21, सर्व रा.पिंपळकोठा, ता.धरणगाव) हे जखमी झाले. या अपघातात मनोज पाटील यांचा डावा हात मोडला गेला तर जखमींना तत्काळ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आरती कोल्हे, गुलाम अहमद यांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी हवालदार गोरख पाटील, गृह सुरक्षा दलाचे विजय जावरे पथकासह दाखल झाले व त्यांनी तत्काळ रस्त्यावर पडलेला आयशर ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !