भुसावळ विभागात स्वच्छतेसोबत वृक्षारोपण अभियान राबवणार


डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची पत्रकार परीषदेत माहिती

भुसावळ : ऑगस्ट महिन्यात अस्वच्छता करणार्‍या दोन हजार 68 प्रवाशांवर कारवाई करून दोन लाख 68 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून आता पंधरवडा संपूनही स्वच्छता मोहिम आगामी काळात रेल्वे प्रशासनाकडून निरंतर राबवली जाणार आहे शिवाय वृक्षारोपण मोहिम राबवली जाणार असल्याची माहिती डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी डीआरएम कार्यालयात झालेल्या पत्रकार परीषदेत दिली. यावेळी वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा, वरीष्ठ मंडळ यांत्रिक अभियंता जी.रामचंद्रन, वाणिज्य निरीक्षक जीवन चौधरी, प्रचार निरीक्षक चेतन फडणीस उपस्थित होते.

भुसावळ विभागात प्लॅस्टीकमुक्त अभियान
डीआरएम गुप्ता म्हणाले की, स्वच्छता पंधरवाड्यात प्रवासी, खाद्यपदार्थ, विक्रेते, रेल्वेचे अधिकार्‍यांसह सर्व कर्मचार्‍यांनी मोहिम यशस्वी केली. स्वच्छ प्रसाधन अंतर्गत चित्रकला घोषवाक्य स्पर्धा, कविता व गीत गायन आदी स्पर्धांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले. रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार भुसावळ, जळगाव, अमरावती, धुळे, चाळीसगाव, बर्‍हाणपूर, मलकापूर, शेगाव, अकोला आदी स्थानकावर प्लास्टिक मुक्त अभियान राबविण्यात आले. संस्कृती फाउंडेशनच्या सदस्यांनी भुसावळ स्थानकावर प्लास्टिकच्या दुष्प परीणामांची माहिती दिली, असेही ते म्हणाले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !