संतापजनक : बाईक अडवत नराधमांनी पती समोरच केला पत्नीवर गँगरेप
बाडमेर : चौघांच्या टोळक्याने दाम्पत्याला मारहाण करीत त्यांची बाईक अडवत व पतीसमोरच पत्नीवर गँगरेप केल्याची संतापजनहक घटना राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात घडली. दाम्पत्य बाईकवरुन बालोतरा ते सरणू मार्गे बाडमेरला जात असताना हा प्रकार घडला. एकानं पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली अन् बाईक घेऊन पसार झाला तर तिघांनी दोघांना गाडीत बसवून निर्जनस्थळी नेत पतीसमोरच तिघांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
तीन आरोपींना अटक
पोलीस उपअधीक्षक शुभकरण म्हणाले की, मंगळवारी पती पत्नी बाईकवर बसून बाडमेरला जात होते. त्यावेळी टोल नाका क्रॉस केल्यानंतर एका इको गाडीत बसलेल्या 4 नराधमांनी दाम्पत्याची बाईक थांबवली. सुरुवातीला पत्नीसमोरच पतीचा बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघांना इको गाडीत बसवून निर्जनस्थळी नेले. याठिकाणी पतीसमोर तिघांनी महिलेवर गँगरेप केला. तीन आरोपींना आम्ही अटक केली असून चौथ्या पसार आरोपीचा शोध सुरू आहे.



