उत्कृष्ट सेवेकरीता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ ; राज्याला एकूण 74 पोलीस पदक


नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 4 पोलीस अधिकार्‍यांना उत्कृष्ट सेवेकरीता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 25 पोलीस शौर्य पदक तसेच प्रशंसनीय सेवेकरिता 45 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी शौर्य पदक श्रेणीमध्ये 630 व सेवा पदक श्रेणींमध्ये 750 असे एकूण 1 हजार 380 पोलीस पदक जाहीर झाली आहेत. शौर्य पदक श्रेणीत 2 ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमजी), तर 628 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि सेवा पदक श्रेणीत विशेष सेवेसाठी 88 पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) आणि 662 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 74 पदक मिळाली आहेत.

90 अधिकार्‍यांना पदक जाहीर
शौर्य पदक श्रेणीत 2 आणि सेवा पदक श्रेणीत 88 अशा देशातील एकूण 90 पोलीस अधिकारी- कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातील चार अधिकारी -कर्मचार्‍यांचा समावेश आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !