आधी तरुणाला बळजबरीने शारीरीक संबंध ठेवण्यास केले मजबूर नंतर केला बलात्काराचा आरोप
महिलेसह चौघांविरोधात पोलिसात गुन्हा : सोशल मिडीयावरील ओळखीचा तरुणाला बसला फटका
पुणे : इन्स्टाग्रामवरुन झालेल्या ओळखीनंतर महिलेने जबरदस्तीने तरुणाला शारीरीक संबंध ठेवण्यास मजबूर केले व नंतर महिलेच्या साथीदाराने तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लुबाडली. या प्रकरणी पनवेलच्या 31 वर्षीय तरुणाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बळजबरी प्रस्थापीत केले संबंध
पीडीत तरुणाची प्रगती नाव सांगणार्या महिलेशी सोशल मिडीयावरून ओळख झाली. महिलेने तरुणास भेटण्यासाठी कोंढव्यातील येवलेवाडी येथे बोलावल्यानंतर 7 ऑगस्ट तरुण पुण्यात आला. येवलेवाडी येथे या महिलेने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग व त्यानंतर तरुण बाहेर पडला असता तरुणाची तिघा अनोळखींनी कार अडवत त्यास मारहाण केली तसेच प्रगती नामक महिलेसोबत बलात्कार केल्याचे धमकावत पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल, असे कागदावर लिहून घेतले. त्यावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला. त्यानंतर फिर्यादी याच्याकडे पाच लाखांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील 50 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डमधून जबरदस्तीने 30 हजार रुपये काढून घेतले. या घटनेने फिर्यादी तरुण घाबरुन जाऊन आपल्या घरी गेला होता. आरोपींकडून उर्वरित पैश्यांची मागणी होऊ लागल्याने त्याने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली.



