राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सालबर्डीजवळ लाखाचे मद्य जप्त

बेकायदा मद्याची वाहतूक भोवली ; ओमनी चालक अटकेत
मुक्ताईनगर- अवैधरीत्या मद्याची वाहतूक होत असल्याच्या गुप्त माहितीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी रात्री केलेल्या कारवाईत एका व्हॅनमधून सुमारे एक लाखांचा देशी-विदेशी दारूचा अवैधा साठा जप्त करीत ओमनी चालकाला अटक केली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुक्यातील सालबर्डी फाट्याजवळ एका व्हॅनमध्ये (एम.एच.19 वाय 0988) मधून बेकायदा मद्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळााल्यानंतर निरीक्षक ई.ना.वाघ, दुय्यम निरिक्षक के.बी.मुळे, वाय.आर.जोशी, व्ही.जे.नाईक, बी.एन.वाणी, एन.व्ही.पाटील, एम.आर.नन्नवरे, जी.डी.अहिरे, एम.आर.वाघ, नंदु पवार यांच्या पथकाने सालबर्डी फाट्याजवळ ओमनीची झडती घेतल्यानंतर त्यात देशी-विदेशी दारूसह बिअरच्या बाटल्या आढळल्या. व्हॅन व दारूसह एक लाख नऊ हजार 96 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ओमनी चालक राजु प्रकाश माळीविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
