भुसावळात दुचाकीच्या डिक्कीतून 20 हजारांची रोकड लंपास

भुसावळ- स्टेट बँक खातेदाराने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली 20 हजारांची रोकडसह एटीएम व अन्य कागदपत्रे चोरीस गेल्याची घटना मंगळवारी दुपारी 1.50 वाजेच्या सुमारास घडली. शहरातील शारदा नगरातील रहिवासी नारायणदास केवलराम वर्णजानी हे जळगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदीराच्या मागील भारतीय स्टेट बँक शाखेत आल्यानंतर दुचाकीच्या डीक्कीत (एम.एच.19 बी.आर.0314) 20 हजारांची रोकड तसेच बँक पासबुक, पैसे भरण्याची स्लिप ठेवली होती मात्र वर्णजानी हे बँकेत चौकशीसाठी जातात चोरट्यांनी संधी साधली. शहर पोलिस ठाण्यात वर्णजानी अनोळखी चोरट्या विरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार साहील तडवी करीत आहे.
