भुसावळ तहसीलच्या आवारातून डंपर लांबवले

भुसावळ- तहसील कार्यालयाच्या आवारातून पुन्हा डंपर चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे तर सातत्याने जप्त वाहने चोरीस जात असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितहोत आहे. यापूर्वी तब्बल तीन वेळा अशा घटना घडल्या आहेत. तहसीलदार दीपक ढिवरे वाळूचा डंपर (एम.एच.19 जेओ 0146) अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असल्याने तो जप्त करीत तहसील आवारात 30 सप्टेंबरला लावला होता. चोरट्यांनी संधी साधीत दोन लाख रुपये किंमतीचा डंपर व त्यात 17 हजार रुपये किंमतीची वाळू लांबवली. तहसील कार्यालयाचे लिपिक महेंद्र दुसाने यांनी फिर्यादीनुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
