भुसावळात रेल्वे अपघातानंतर धडकले प्रशासन


मॉक ड्रील असल्याचे कळताच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना वाटले हायसे : सतर्कतेची पाहणी

भुसावळ- प्रवासी गाडीला अपघात झाला आहे, अनेक प्रवासी जखमी आहेत, तातडीने मदत हवी आहे, असा दूरध्वनी भुसावळ रेल्वेच्या नियंत्रण कक्षात आल्यानंतर रेल्वे यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली. रेल्वेच्या आत्पकालीन गाडीवरील अधिकारी, कर्मचारी, आपदा प्रबंधन बल पुणे, सिव्हील डिफेंन्स, सेंट जॉन रुग्णवाहिका, भारत स्काऊट आणि गाईड, रेल्वे हॉस्पीटलमधील वैद्यकीय अधिकार्‍यांचे पथक आदी घटनास्थळी दाखल झाले मात्र उपाययोजनांना सुरुवातही झाली मात्र काही वेळानंतर रेल्वे प्रशासनाने हा अपघात नसून केवळ मॉक ड्रीक कर्मचारी सतर्कता तपासणीसाठी असल्याचे जाहीर करताच सर्वांनाच हायसे वाटले. रेल्वे कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजता रेल्वेने मॉक ड्रील घेतले.

रेल्वे प्रशासनात खळबळ
रेल्वेच्या कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये अपघात झाल्याचे वृत्त कळताच वैद्यकीय पथक, रुग्ण वाहिका, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, डीआरएम, एडीआरएम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झालेत. रेल्वेचे कर्मचारी व परीसरातील नागरिकांनी गर्दी केली. यावेळी आरपीएफने जमावाला अपघातग्रस्त परीसरातून दूर केले. यावेळी एनडीएफ पथकही घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफ पथकाचे प्रमुख एम.डी.शकील यांच्यासह त्यांच्या पथकातील 23 जवानांनी अपघातग्रस्त डब्याचा (94420)ताबा घेतला. घटनास्थळी पोचलेल्या रुग्ण वाहिकेने जखमींना रुग्णालयापर्यत पोचविण्याचे काम केले. वैद्यकीय पथकाने घटनास्थळाच्या परीसरात तत्काळ तंबू ठोकत जखमींवर उपचार केले. यावेळी अपघातग्रस्त डब्यात अडकलेले प्रवासी हे जीव वाचविण्यासाठी आक्रोश करीत होते. जखमी प्रवाशांना डब्यातून बाहेर काढण्यासाठी रेल्वे कर्मचारी व एनडीआरएफ पथकातील जवान यांनी जीवाची पर्वा न करता प्रवाशांना बाहेर काढले.









खरोखर अपघात झाल्यास भास
कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये खिडकीचे गज कापण्यासाठी आधुनिक इलेक्ट्रीकवर चालणारे कटर, पत्रा कापण्यासाठी लागणारे आधुनिक ड्रील मशीन, डबा उंच असल्याने खिडकीपर्यत पोचण्यासाठी लागणारी अत्याधूनिक शिडी यांचा वापर करण्यात आला. यावेळी या पथकाचे प्रमुख पार्थ सेन यांनी आधुनिक उपकरणांच्या साह्याने डब्याचा पत्रा कापून प्रवाशांना बाहेर काढले, खिडकीतून आत स्ट्रेचर देत प्रवाशांना डब्यातून बाहेर काढले तर अखेरीस हा अपघात नसून रेल्वे कर्मचार्‍यांची सतर्कता तपासणीसाठी मॉक ड्रील घेण्यात आल्याचे कळताच सर्वांना हायसे वाटले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !