जिल्ह्यातील 11 मतदार संघात मतदान यंत्र रवाना


भुसावळ- विधानसभा निवडणुकीचा आखाडा तापला असतानाही दुसरीकडे प्रशासनही जोमात कामाला लागले आहे. निवडणुकीसाठी लागणारे सर्व मतदान यंत्रणे भुसावळ तहसील कार्यालयाच्या गोदामात असल्याने मंगळवारी जिल्ह्यातील 11 मतदारसंघासाठी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन रवाना करण्यास सुरुवात झाली. मतदानाचे साहित्य नेण्यासाठी मंगळवावरी तहसील कार्यालातील आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. मंगळवारी सायंकाळपासून भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारातून ट्रकद्वारे पोलिस बंदोबस्तात ही यंत्रे रवाना करण्यात आली. यंत्राची वाहतूक करण्यासाठी जळगाव येथून खास अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !