भुसावळ विधानसभा निवडणूक : 13 इच्छूaकांनी नेले अर्ज

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी आखाडा तापला असताना दिवसागणिक इच्छुकांची संख्या वाढत आहेत तर दुसरीकडे अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी 13 इच्छूकांनी उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयातून नेण्याचे सांगण्यात आले तर आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनीदेखील अर्ज नेल्याचे सांगण्यात आले. इच्छुकांमध्ये विजय साळवे (राष्ट्रीय दलित पॅथर), गौरव नन्नवरे (मनसे), संतोष साबळे, रवींद्र निकम, विलास खरात (भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस), अजय इंगळे (बहुजन मुक्ती पार्टी), सुनील सुरवाडे (वंचीत बहूजन आघाडी), हरीष ससाणे, प्रतिभा शिरसाठ, संजय वानखेडे, रजनी संजय सावकारे (अपक्ष), विजय नमाडे व राजेश इंगळे यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले.
