सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या संचालकांची सीआयडीकडून चौकशी

भुसावळ- वरणगाव येथील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सहकारी पतसंस्थेेच्या पुणे येथील सांगवी शाखेत 59 लाखांच्या अपहार झाल्याची तक्रार सहकार विभागाच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक विभागीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी मंगळवारी वरणगाव पोलिस ठाण्यात संचालक मंंडळाच्या सदस्यांची चौकशी करून जाबजबाब नोंदवले. या कारवाईने वरणगावसह सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संचालकांचे नोंदवले जवाब
महाराष्ट्रासह राज्यव्यापी कारभार असलेल्या वरणगाव शहरातील सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सहकारी पतसंस्थेेच्या पुणे येथील सांगवी शाखेत 59 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा सांगवी पोलिस ठाण्यात दाखल आहे. नंतर हा गुन्हा हा राज्य शासनाच्या गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आला तर या विभागाच्या माध्यमातून नाशिक विभागीय गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदेश पालांडे यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात येवून संचालक गणेश झोपे, मोहम्मद इकबाल जमाल कच्छी, अशोक हरी बढे, नामदेव मोरे, शकुंतला थोरात, राजेंद्र चौधरी, विजय वाघ, डिगंबर सुरवाडे, नंदकुमार भंगाळे, भिकु शंकर वंजारी आदींची चौकशी करून जाब-जबात नोंदवण्यात आला. दरम्यान, नोंदवण्यात आलेले जबाब न्यायालयात सादर केले जाणार असल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे नाशिक विभागीय पोलिस निरीक्षक संदेश पालांडे यांनी सांगितले. दरम्यान, संस्थेच्या पतसंचालकांवर काय कारवाई होते ? याकडे सहकार क्षेत्रासह नागरीकांचे लक्ष लागले आहे.