संतापजनक : लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या विवाहितेवर पूजार्‍यानेच केला बलात्कार


नवी दिल्ली : लग्नानंतर मंदिरात दर्शनासाठी पतीसोबत आलेल्या विवाहितेवर पुजार्‍याने बलात्कार केल्याची भयंकर घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडली. पोलिसांनी आरोपी पूजार्‍याला अटक केली आहे. गोपाळ उर्फ मुकेश जांगीड असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

नशेत औषध देवून अत्याचाराचा आरोप
रविवारी सायंकाळी महिला आपले वडील आणि पतीसह भेरुची मंदिरात लग्नानंतर दर्शनासाठी आली असता पूजार्‍याने रात्री होम-हवन करण्याच्या बहाण्याने तिला थांबायला सांगितलं. यानंतर पुजार्‍याने तिचे पती आणि वडिलांना चौकात काही कामासाठी पाठवल्यानंतर विवाहिता एकटी असल्याचा फायदा घेत नशेचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. सकाळी जाग आल्यानंतर पूजारी तिला नातेवाईकांसह आपल्या कारमधून तिच्या गावी सोडायला आला. तेथे पोहोचल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला. आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात तो कार सोडून पसार झाल्यानंतर पोलिसांच्या टीमने अलवर जिल्ह्यातील नारायणपूर, जयपूर जिल्ह्यातील शाहपुरा अशा अनेक ठिकाणी बंदोबस्त वाढवला. शेवटी गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलिसांनी फरार पुजार्‍याला अटक करण्यात आली. आरोपी विवाहित असून त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !