मुलीची हत्या करीत मृतदेह नाल्यात फेकला
नवी दिल्ली : मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आल्याची घटना बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात घडली. सावत्र आईसह वडिलांनी हे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वीच तरूणीच्या मामाने तरूणीच्या वडिलांवर आणि सावत्र आई विरोधात हत्येचा संशय व्यक्त करत ती बेपत्ता असल्याचा तक्रार दाखल केली होती. दिव्या राय असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मयताच्या मामाने पटवली ओळख
आरा शहरातील नवादा भागातील सर्वोदय नगर निवासी सोनू कुमार रायची 16 वर्षीय मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. तरूणीचा मृतदेह सापडल्यावर अजीमाबाद पोलिसांनी तिची ओळख न पटल्याने मृतदेह पोस्टमार्टमसाठी आरा येथे पाठवला होता. पण यादरम्यान घटनास्थळी काढलेली तरूणीचे काही फोटो तिच्या मामापर्यंत पोहोचले. ज्यानंतर तिची ओळख पटली. दरम्यान, मयताच्या सावत्र आईला अटक करण्यात आली असून वडिल मात्र पसार झाले आहेत.



