भुसावळच्या क्ले बॉक्सिंग स्कूलच्या खेळाडूंची शालेय महाराष्ट्र बॉक्सिंग स्पर्धेत निवड

भुसावळ- क्रीडा व युवक सेवासत्र न्यायालय पुणे आणि जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक विभागीय शासकीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान जळगावच्या शिवाजी महाराज क्रीडा संकुलात झाल्या. या स्पर्धेत क्ले बॉक्सिंग स्कुलच्या खेळाडूंनी विविध वयोगटात यश मिळवले. या स्पर्धेत नाशिक मनपा, धुळे मनपा, जळगाव मनपा, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील संघांनी सहभाग नोंदविला.
नाशिक विभागातून खेळाडूंची निवड
17 वर्षे वयोगटातून क्ले बॉक्सिंग स्कुलचेे बॉक्सर नेहा कन्हैय्या करडे, संजना विरु दांडोले, कोमल पांडव,सेजल चंदन तर 19 वर्षा वयोगटाखालील गटातून सागर सुकदेव सोनवणे, पवन संजू सावळे तसेच 17 वर्षा वयोगटाखालील भावेश ठाकुर या खेळाडूंची नागपूर येथे होत असलेल्या शालेय शासकीय महाराष्ट्र राज्य बॉक्सींग स्पर्धेसाठी नाशिक विभागाकडून निवड झाली.

यांचे लाभले मार्गदर्शन
या खेळाडूंना क्ले बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ, सहप्रशिक्षक संदीप वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडुंचे क्ले बॉक्सिंगचे अध्यक्ष संदीप शिंगारे, एकलव्य स्पोर्ट फाउंडेशनचे सचिव संदेश सुरवाडे व भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष राहुल घोडेस्वार, सचिव चुन्नीलाल गुप्ता, सुनील नवगिरे, अनिल सपकाळे, सचिन गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
