माजी मंत्री खडसेंऐवजी अॅड.रोहिणी खडसेंना उमेदवारी ?

मुक्ताईनगर : सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना भाजपाने जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने खडसे समर्थक अस्वस्थ असतानाच भाजपाच्या दुसर्या यादीतही खडसेंना तिकीट मिळणार नसल्याच्या चर्चा सुरू आहे. खडसेंऐवजी त्यांच्या कन्या व जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा असलीतरी त्याबाबत मात्र अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकलेला नाही.
खडसेंच्या भूमिकेकडे लागले लक्ष
भाजपाच्या पहिल्या यादीत नाव न आल्याने खडसेंसह समर्थक प्रचंड अस्वस्थ आहेत तर दुसरीकडे भाजपाच्या दुसर्या यादीतही खडसेंचे नाव न आल्यास खडसे काही निर्णय घेतात का? हेदेखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपा सरकारच्या भूमिकेने खडसे समर्थक प्रचंड संतप्त झाले आहेत.