माजी मंत्री खडसे पक्षाचे ज्येष्ठ नेते, ते सांगतील त्याला मिळणार तिकीट !


पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्ष दिली खडसेंच्या तिकीट कापल्याच्या वृत्ताला कबुली

जळगाव : नाथाभाऊ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते सांगतील त्या उमेदवारालाही तिकीट मिळू शकते, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी जळगावात साधल्यानंतर दिली. ते म्हणाले की, तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत मी नाही तर मुख्यमंत्री व आमचे दिल्लीतील नेते याबाबत निर्णय देतील. रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा आहे याबाबत ते म्हणाले की, चर्चा तर सर्वत्र आहे मात्र तिकीट वाटपाचा निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेतील शिवाय नाथाभाऊ ज्येष्ठ असल्याने ते ज्याला सांगतील त्या उमेदवाराला तिकीट मिळेल, असे सांगून त्यांनी अप्रत्यक्षरीत्या खडसेंना तिकीट मिळणार नसल्याच्या वृत्ताला शिक्कामोर्तब केले.

तर उद्या माझा समाजही होईल नाराज
नाथाभाऊंना तिकीट न मिळत नसल्याने लेवा समाज नाराज झाला आहे याबाबत काय सांगाल या प्रश्‍नावर महाजन यांनी प्रत्येक निर्णयाने कुणी ना कुणी नाराज होतच असतो. उद्या मला तिकीट मिळाले नाही तर माझा समाजही नाराज होईल, कुणाच्याही समाजाला त्यामुळे वाईट वाटेल, असेही त्यांनी सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !