डोंगरकठोर्‍यात तरुणाचा चाकूने गळा कापून निर्घृण खून


डोंगरकठोरा : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा गावातील 17 वर्षीय तरुणाचा चाकूने गळा कापून व दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. शरीफ मेहरमान तडवी (17) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेतमजुर असलेल्या तरुणाचा खून नेमका कुणी वा केला ? याचे कारण अद्याप उघडकीस आले नाही. डोंगरकठोरा गावाकडून वड्रीकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला शरीफचा मृतदेह गुरुवारी सकाळी शेतमजुरांना शेतात जाताना आढळल्याने त्यांनी यावल पोलिसांनी माहिती कळवताच त्यांनी धाव घेतली. मृत तरुणाच्या पश्‍चात आई, वडिल, दोन भाऊ असा परीवार आहे.

यावल पोलिसांची घटनास्थळी धाव
खुनाची माहिती कळताच यावलचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेतली. घटनास्थळी मोबाईल कव्हर तसेच मोबाईलचे कव्हर व मोबाईल रस्त्याच्या कडेला फेकलेले आढळला.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !