संतापजनक ! : अल्पवयीन मुलीवर तब्बल नऊ महिने बलात्कार


नवी दिल्ली : तब्बल 9 महिने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बिहारमध्ये उघडकीस आली. बिहारच्या बेतिया जिल्ह्यातील एका गावात हे मन सुन्न करणारी घटना घडली. पीडित मुलगी इयत्ता नववीची विद्यार्थिनी असून ती ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या एका मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी मैत्रिणीचा चुलत भावाने पीडितेवर बलात्कार केला तसेच बलात्कार झाल्यानंतर आरोपीने चाकूने पीडितेच्या छातीवर स्वत:चं नाव देखील कोरलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. फोटो आणि व्हिडीओच्या आधारे आरोपीने पीडितेवर तब्बल 9 महिने बलात्कार केला तसेच पीडितेला घरातून पैसे आणून देण्यासाठी दबाब देखील टाकला जात होता. यामुळे पीडितेने आपल्याच घरात चोरी करून आरोपीला 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि काही दागिने दिले. तरीही तिच्यासोबत होणारा अत्याचार थांबला नाही. पण गेल्या महिन्यात पीडित मुलगी आपल्या आई वडिलांकडे दिल्लीला गेल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी शुभम गुप्ता ऊर्फ सन्नी, मैत्रीण आर्या सिंह यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला. देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !