धुळ्यात उद्या ‘महाजनादेश’ यात्रेचे होणार जंगी स्वागत


धुळे : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर 7 व 8 रोजी जळगाव जिल्ह्यात महाजनादेश यात्रा खंडित करण्यात येवून सर्व सभा व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते मात्र शुक्रवारी ही यात्रा धुळे शहरात दाखल होणार आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता चाळीसगाव रोडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे. आग्रा रोडने गांधी पुतळा, देवपूर, दत्तमंदिर, नगावबारीमार्गे नगाव येथे यात्रा आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ही सोनगीर व नरडाणा मार्गे दोंडाईचा येथे आल्यानंतर सभा होईल व त्यानंतर ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यात गेल्यानंतर तिचा समारोप होणार आहे.


कॉपी करू नका.