माजी आमदार शिरीष चौधरींनी शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज


रावेर : माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत गुरूवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी (कवाडे गट) शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीतर्फे आपली उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला. रावेर शहरातून काढलेल्या जोरदार रॅलीत व नागरीक महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. रावेर शहरातील आठवडे बाजारात आधी कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षातील मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. मेळाव्यानंतर ढोल-ताश्याच्या गजरात वाजता-गाजत माजी आमदार शिरीष चौधरी यांची उघड्या जीप वर बसवून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार उल्हास पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार रमेश चौधरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, रावेर नगराध्यक्ष दारा मोहम्मद, जिल्हा परीषद सदस्य सुरेखा पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, माजी सभापती राजीव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, प्रा.मुकेश येवले, लेवा पंचायत युवा अध्यक्ष धनंजय कोल्हे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, धनंजय चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख महेमूद, नगरसेवक सादीक शेख, गोंडू महाजन, असदुल्ला खा, एम.ए.खान, किशोर पाटील, आर.के.चौधरी, गुलाब तडवी, हमीद तडवी, अर्जुन जाधव, प्रकाश मुजुमदार, संजय चौधरी यांच्यासह यावल, फैजपूर, रावेर येथील सर्व बूथ प्रमुख दोन्ही तालुक्यातील सर्व काँग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस, नगरसेवक सर्व पंचायत समिती व जिल्हा परीषद सदस्यांसह मोठ्या संख्येने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य महिला व पुरुष उपस्थित होते.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !