भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे तीन महिन्यांपासून संपर्कात


राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवारांच्या दाव्याने खळबळ : खडसे संपर्कात कधीही नव्हतो

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात असल्याचा दावा गुरुवरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. ते आपल्या पक्षात येणार की नाही ? हेदेखील अनिश्‍चित असल्याचेही नमूद त्यांनी केले आहे. खडसेंचे तिकीट कापल्यानंतर ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्ताईनगर भेटीला निघाल्याचे वृत्तही आले मात्र नंतर पवार दुपारपर्यंत आलेच नाहीत त्यामुळे अजित दादा येणार की नाही येणार ? हेदेखील स्पष्ट नाही. दुसरीकडे ठाण्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी खडसे हे तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. कुणीही पक्ष बदलण्याचा विचार तत्काळ करत नसतो, अशी पुस्ती जोडून एकनाथराव खडसे यांचा जन्म बारामतीचा असल्याचे सूचक वक्तव्यदेखील त्यांनी केले.

खडसे म्हणाले कधीही संपर्कात नव्हतो
खडसे समर्थकांचा गुरुवारी झालेल्या मेळाव्यात खडसे यांनी आतापर्यंत पक्षाचे सर्व आदेश पाळत आलोय त्यामुळे आताही पक्ष देईल तो आदेश मान्य करू, असे म्हणताच कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. यानंतर खडसे यांनीच शरद पवार यांचा दावा खोडून काढत आपण कधीही पवारांच्या संपर्कात नव्हतो आणि राहणारही नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, खडसे निवडणूक लढविण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !