जळगावचे आमदार राजूमामा भोळेंनी शक्तीप्रदर्शन करीत दाखल केला उमेदवारी अर्ज

जळगाव : महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी गुरुवारी दुपाी दोन वाजता भाजपातर्फे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी राज्याचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जी.एम.फाऊंडेशन येथून भव्य रॅलीला ढोल-ताशांच्या सुरुवात झाली. ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागतही झाले.
यांचा रॅलीत सहभाग
रॅलीत गुरुमुख जगवानी, आमदार चंदूलाल पटेल, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख उदय सावंत, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, शिवसेना जिल्हा महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लद्धा, ललित कोल्हे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद बाविसकर, विभाग अध्यक्ष दीपक सपकाळे, महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, तसेच रासप, शिवसंग्राम, रयत क्रांतीचे पदाधिकारी व जि. प. सभापती पोपटतात्या भोळे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, महिला सभापती मंगला चौधरी, शिवसेना मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नितीन बरडे, मानसिंग सोनावणे व शोभाताई चौधरी तसेच ठझख चे अशोक तायडे, नंदाताई बाविस्कर, भाजपा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, दीपक सूर्यवंशी, राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, दीपक साखरे, सचिन पानपाटील सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांचे अध्यक्ष व भाजपा शिवसेनेचे सर्व नगरसेवक महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.