पक्षादेश मान्य -माजी मंत्री एकनाथराव खडसे

भाजपातच राहण्याचा निर्णय : तिकीट वाटपाचा निर्णय सोडला पक्षश्रेष्ठींवर
मुक्ताईनगर : भाजपा पक्षश्रेष्ठींकडून जो आदेश मिळेल तो आपल्याला मान्य राहिल, 42 वर्ष पक्षाची सेवा केल्याने एकही पक्ष विरोधी निर्णय घेतलेला नाही, असे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंनी सांगत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला. खडसेंचे तिकीट कापल्यानंतर ते पक्ष सोडण्याच्या चर्चा रंगल्या मात्र खडसेंनी पक्षातच राहण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.
खडसे म्हणाले, सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी खडसेच
खडसे म्हणाले की, आपण भाजपाचे आपण निष्ठावंत कार्यकर्ते असून आतापर्यंत पक्षाने जो काही निर्णय दिला तो आपण मान्यच केला. मंत्री पदाचा राजीनाम्याचा निरोप आल्यानंतर एका मिनिटात राजीनामा आपण राजीनामा दिला, पक्ष आदेशानेच मंत्रीपद सोडल्याचे ते म्हणाले. सलग सहा टर्म आमदार राहिलो. मुक्ताईनगर मतदारसंघातील लोकांनी खूप प्रेम दिल्याचा उल्लेख करीत खडसे म्हणाले की, मला तिकीट नाही, असे पक्षाने सांगितल्यानंतर कुणाला तिकीट द्यायचे याची विचारणा केली मात्र माझ्यासाठी सर्व कार्यकर्ते हे खडसेच आहेत त्यामुळे त्याबाबत काहीही बोललो नाही, एखादा विषय आपल्या आकलनापलिकडे असतो, असेदेखील त्यांनी सांगितले.