जळगावच्या माजी महापौरांच्या कन्येची भुसावळात आत्महत्या


भुसावळ : जळगावचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या विवाहित कन्येने भुसावळात सासरी गळफास घेत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही तर मयताने मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहित त्यात कुणालाही जवाबदार धरू नये, असे म्हटले आहे. नयना जितेंद्र सपकाळे (27, हिरासेठचा वाडा, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

पती घरी नसताना आत्महत्या
शहरातील खळवाडी भागातील शिवकॉलनी परीरातील खुशाल तुकाराम झोपे यांच्या घरात जितेंद्र सपकाळे हे भाड्याने राहतात. गुरूवारी सकाळी 8.45 ते कामावर गेल्यानंतर पत्नी नैना सपकाळे (27) यांनी त्यांच्या राहत्या घरात बेडला ओढणी बांधून गळफास घेतला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृत नैना यांची तीन वर्षाची मुलगी पूर्वा शाळेतून घरी आल्यावर ती घरात रडत असल्यानंतर घर मालक प्रियंका झोपे चौकशी केली असता, आतील खोलीचे दार बंद होते, ते दार उघडताच नैना सपकाळे यांनी गळफास घेतल्याचे चित्र समोर आले.









घटनास्थळी पोलिसांनी घेतली धाव
डीवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकार्‍यांसमक्ष ओढणी काढण्यात आली. विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून त्यातून काही माहिती तपासाच्या दृष्टीने मिळते का, हे तपासले जात असल्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे म्हणाले.

वडिलांना सुट्टी द्या : मृत्यूपूर्व विवाहितेची चिठ्ठी
मृत नयना यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहिली असून त्यात त्यांनी आत्महत्येला कुणालाही जवाबदार धरू नये, असे म्हटले आहे शिवाय वडील अशोक काशीनाथ सपकाळे यांना कारागृहातून सुट्टी मिळावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे. सपकाळे हे जळगावचे माजी महापौर असून घरकुल प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने ते नाशिक कारागृहात आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !