भुसावळात मारहाण करीत घर साहित्याचे नुकसान


भुसावळ : माझ्या बहिणीची छेड का काढतो ? याचा जाब विचारल्याच्या कारणावरून बहिण व भावास तीन युवकांनी बेदम मारहाण केली तसेच घरातील साहित्याचीही तोडफोड करून नुकसान केल्याची घटना कोळीवाड्यात घडली. या प्रकरणी बाजारपेठ तिघा युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली.

जाब विचारल्यानंतर तरुणीच्या भावास मारहाण
वांजोळा रोड, कोळीवाडा भागातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचे छेड काढून त्रास संशयीत आरोपी देत होते शिवाय गुरूवारी तरुणी शाळेत असतांना पुन्हा तोच प्रकार घडल्यानंतर मुलीच्या भावाने छेड का काढता ? असा जाब विचारल्याचा राग आल्याने उल्हास भोळे, दीपक कलाल व दीपक बाविस्कर यांनी मुलीच्या घरी येवून त्या मुलीला व तिच्या भावास मारहाण केली.तसेच घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी मुलीच्या भावाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी उल्हास भोळे (19) यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस हवालदार वाल्मिक सोनवणे तपास करीत आहेत.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !