सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील भाजपाच्या मार्गावर
उद्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
शहादा- भाजपने अडचणीच्या काळात मदत केल्यानेच कार्यकर्त्यांसह तरुणांच्या आग्रहामुळे भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील यांनी बैठकीत दिली. महाजनादेश यात्रेनिमित्त शुक्रवारी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी एक वाजता होत असलेल्या जाहीर सभेत भाजपत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला जाणार असल्याचे ते म्हणाले. सातपुडा साखर कारखान्याच्या आवारात बुधवारी दुपारी त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. कार्यकर्ता म्हणजे माझा पक्ष ही भूमिका नेहमीच राहणार असून सर्वसामान्यांना, शेतकर्यांना न्याय देण्यासाठीच योगदान राहील, असेही त्यांनी सांगितले.